झारखंड (वृत्त संस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयक संमत झाल्यानंतर प्रथमच मौन सोडले असून नागरिकत्व कायदा हा योग्यच असून आजपर्यंत जे काम पाकिस्तान करीत होते ते काम आता काँग्रेस करीत आहे अशी टीका करताना नागरिकत्व कायद्याचे समर्थन केले आहे. ते झारखंडच्या दुमका येथे निवडणूक रॅलीला संबोधित करीत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढविला. काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष नागरिकत्व कायद्यावरुन विनाकारण वादळ निर्माण करून आग लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. आग लावणारे कोण आहेत? हे त्यांच्या कपड्यावरुन माहित पडते. आता यांच्याकडून लोकहिताची कसलीही आशा राहिलेली नाही. हे लोक केवळ त्यांच्या कुटुंबियांची काळजी करण्यातच मग्न आहेत अशी टीका त्यांनी यावेळी केली.
कालपर्यंत जे काम पाकिस्तान करीत होते ते काम आता काँग्रेस करीत आहे - नरेंद्र मोदी