उद्योजक फारोख कपूर यांची सातारमधील उद्योग सुरू करण्याची मागणी

उद्योग सुरू करण्याची सातारा (प्रतिनिधी)-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा मधील प्रतिबंधात्मक क्षेत्राचा फेरविचार करून औद्योगिक वसाहतीतील कारखाने सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी सातारामधील नामवंत उद्योजक श्री. फारोख कपूर यांनी राज्याचे गृह- राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. ___या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, कपर उद्योग समूह हा सातारा औद्यो- गिक वसाहतीतील सर्वात मोठा समूह आहे. कंपनी विविध प्रकारची इंजिन, इलेक्ट्रिकल जनसेट आणि इंजिनाचे इजिनाचे विविध सुटे भाग तयार करते. सुमारे ३००० कर्मचारी कंपनीत काम करतात. कंपनी तीन हजार मिलियन- पेक्षा जास्त रुपयांची जगातील जवळपास सर्वच देशात निर्यात करते. कंपनीच्या निर्यातीच्या प्रक्रियेवर दीड हजार कर्मचारी , ७० पुरवठादार आणि त्यांचे सुमारे ३०० कर्मचारी अवलंबून आहेत. कंपनीच्या निर्यातीवर परदेशा- तील उद्योग अवलंबून आहेत.अत्या- वश्यक सेवेतील देशातील विविध __घटकांनाही कंपनीच्या उपकरणांची व सुट्या भागांची आवश्यकता आहे. आमचा स्पर्धक चीन आहे. त्यामुळे तो या परिस्थितीचा फायदा घेण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहे. आमचे ग्राहक जर चीनकडे वळले तर देशाला परदेशी चलनाचे नुकसान होऊ शकत तसेच सातारमधील बेरोजगारी वाढू शकेल. राज्य शासनाने तिसऱ्या लॉक- डाऊनची घोषणा केली आहे. त्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळून रेड झोनमध्ये असलेले उद्योगही सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सातारा शहरात परवानगा दिला आह. सातारा शहरात एक रुग्ण सापडल्याने संपूर्ण कोडोली परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे.त्यामुळे औद्योगिक वसाहत बंद आहेत. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्राची फेररचना करून औद्योगिक क्षेत्रातील उद्योग सुरू करण्याची परवानगी देण्यास जिल्हा प्रशासनाला सांगावे. त्यासाठी सरकारने जाहीर केलेल्या अटींचे पालन केले जाईल. याची खात्री या पत्रात देण्यात आली आहे.


Popular posts
राज्यातल्या एस.टी. स्टॅन्ड आवारातील व्यवसायीकांचे बंद काळातले भाडे माफ करा सादिक खाटीक यांची मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी .
मेंढपाळांना सुविधा , सहानुभूती , संरक्षण दिले जावे . सादिक खाटीक यांची मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी
खाजगी शिक्षणसंस्था व खाजगी शाळांना फी वाढीस पुणे जिल्ह्यात परवानगी देवू नये - बळीराजा शेतकरी संघटना महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुरेखा जाधव
केंद्र सरकार दारू विक्री सुरू करणार असेलतर गांजा लागवडीसाठी शेतक-यांना परवानगी घ्यावी÷बळीराजा शेतकरी संघटना महिला आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष सुरेखाताई जाधव