नागपूर (वृत्तसंस्था) :यंदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसलेला अवकाळी पाऊसाचा तडाखा व त्यामुळे त्यांचे झालेले नुकसान व त्यासाठी सरकारने आतापर्यंत काही मदत केली नाही तसेच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी यासाठी राज्यातील प्रमुख विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत सरकारवर जोरदार तोफ डागली आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, सध्याचे सरकार हे स्थगिती सरकार असून सत्तेत येताच सरकारने विकासकामांना स्थगिती दिली आहे. सत्तेसाठी लाचारी करणाऱ्या व स्वा. सावरकरांचा अवमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांचा चहाही आम्हांला नको असे सांगत (पान ४ वर..)
कर्जमाफी व अवकाळी मदत यांसाठी भाजपा आक्रमक