ग्रामीण भागातील कलावंतांना व्यासपीठ देण्याची गरज - शास्त्रज्ञ डॉ. व्ही. के. सुरी

- शास्त्रज्ञ डॉ. व्ही. के. सुरी पंढरपूर (प्रतिनिधी)- कलावंतांनी आणि कारागिरांनी आपल्या अंगीकृत कलामध्ये निपुण होत असताना आपल्या व्यवसायाशी संलग्न इतर व्यवसायातील कलागुण देखील आत्मसात करावेत. यामुळे आपल्यातील कलांचा विकास होवून आणखी नवीन कलाकृतींचा उदय होत असतो. आपल्या निर्माण केलेल्या मालाची, वस्तुची गुणवत्ता सर्वदूर पोचविण्यासाठी ग्रामीण भागातील कलावंतांना व कारागिरांना वेळोवेळी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे, यामुळे विकासाला गती येईल, असे प्रतिपादन भाभा अणुसंशोधन केंद्राचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. व्ही. के. सुरी यांनी केले. __ गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित डिप्लोमा इंजिनियरींगमध्ये संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील कलावंतांसाठी व कारागिरांसाठी आयोजलेल्या एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शास्त्रज्ञ डॉ. सुरी हे उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.दीपप्रज्वलनानंतर प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ यांनी या कार्यशाळेच्या आयोजनाचा हेतू सांगून यामध्ये कच्च्या मालापासून ते वस्तू पर्ण करून विक्री करेपर्यंतच्या बाबी क्रमवार सांगितल्या. फोटो केमिकल मशीन' साठी लागणारा कच्चा माल आणि आवश्यक बाबींचा योग्य साठा करून संपूर्ण वस्तू अथवा मालाला योग्य बाजारपेठ कशी मिळवायची? याबद्दलचा अनुभव सांगितला.या कार्यशाळेत लाखेच्या सहाय्याने चुडा तयार करणे,फोटो केमिकल मशीनच्या सहाय्याने तांबे, पितळ आदी धातू वापरुन सुबक मूर्ती, प्लेट तयार करणे, त्याची आकर्षक फ्रेममध्ये बसविणे, की-चेन, लहान मुलींच्या कानात घालणारे दागिने, शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तू बनविण्यासाठी कार्यशाळेत प्रात्यक्षिकांद्वारे शिक्षण देण्यात आले. यावेळी अनेक कलावंतांनी देव-देविकांचे सुबक कलाकृती, चुडा बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. यावेळी अनेक कलावंतांनी यासाठी आवश्यक माहिती जाणून घेतले.कलावंतांनी व प्राध्यापकांनी तयार केलेल्या वस्तूंची पाहणी करून डॉ. सुरी व प्राचार्य डॉ. मिसाळ यांनी योग्य मार्गदर्शन केले. या कार्यशाळेसाठी ५५ कलावंत कार्यशाळेसाठी उपस्थित केले. यावेळी संस्थेचे प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.