‘एफएटीएफ' अन् पाकिस्तान

यपणे मदत करत असतात त्यांच्यावर फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) जातीने देखरेख ठेवत असतो. रविवारपासन एफएटीएफची एक परिषद पॅरिसमध्ये सुरू झाली असून, या परिषदेत २०५ देश सहभागी होत आहेत. ही परिषद सुरू होण्याअगोदर एफएटीएफने दहशतवादाला मदत करणाऱ्या काही देशांची नावे जाहीर केली आहेत. या ब्लॅक लिस्टमध्ये उत्तर कोरिया व इराण हे देश आहेत. पण पाकिस्तानचाही यात समावेश होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. पाकिस्तानच्या या यादीत समावेश होईल, असा इशारा एफएटीएफने दिला आहे. या यादीत समावेश होऊ नये म्हणून पाकिस्तानने दहशतवाद्यांविरोधात कठोर पावले उचलावीत यासाठी त्यांना चार महिन्यांची सवलत दिली आहे.