सातारा (प्रतिनिधी)-जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून लोक मास्क व सॅनिटायझर खरेदीसाठी विक्रेत्यांकडे जात आहेत त्याचा गैरफायदा घेऊन काही विक्रेते काळाबाजार करीत असल्याचे राज्याच्या विविध भागात निदर्शनास आले आहे. सातारा जिल्ह्यात असे प्रकार आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करून त्याचे दुकान सील केले जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोवाड-१९ च्या व । ढ त्या | स स गाम ळे | करण्यात येणाऱ्या उपाययोजनात एन | ९५ मास्क, २/ ३ प्लाय सर्जिकल मास्क, तसेच हात धुण्यासाठी सॅनिटायझर अनेक विक्रेत्यांकडे मिळत नाहीत. काही जणांकडे आहेत पण ते जादा दराने विक्री करीत आहेत असे आढळले आहे. ___ केंद्र सरकारने आवश्यक वस्तू अधिनियम १९५५ अन्वये एका अधिसूचनेद्वारे ३० जूनअखेर या दोन वस्तू अत्यावश्यक घोषित केल्या आहेत. यानसार शासनाने विक्रेत्यां- सोबत विचारविनिमय करून या वस्तूचे उत्पादन वाढविणे तसेच या वस्तूंची किंमत निर्धारित करण्याचे अधिखार दिले आहेत.
सॅनिटायझर, मास्कचा काळाबाजार न करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा विक्रेत्यांना इशारा