मुंबई (प्रतिनिधी)- दिवसेंदिवस महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने राज्य सरकारने राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था चित्रपटगहे. मॉल्स. गावोगावी होणाऱ्या यात्रा यावर ३१ मार्चपर्यंत बंदी घातली असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मात्र यातन दहावी, बारावी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वगळण्यात आले असून त्या परीक्षा ठरलेल्या दिवशी होतील असे जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा राज्यात लागू करण्यात आला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राज्यातील सर्व शहरातील मॉल्सही प्रतिबंधात्मक काळजी म्हणून ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (पान ४ वर...)
महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक संस्था, चित्रपटगृहे व मॉल्स ३१ मार्चपर्यंत बंद राहणार