यात्रा समितीवर गुन्हा दाखल सातारा(प्रतिनिधी)- सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधन येथील ग्रामदैवत भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक व वार्षिक यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून केलेल्या उपायायोजनेत अडथळा आणल्याप्रकरणी तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याने बावधन यात्ता समितीच्या अध्यक्षांसह चार जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ___ या प्रकरणी मंडल अधिकारी सचिन जाधव यानी फिर्याद दाखल केली असून गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये यात्रा समितीचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, उपाध्यक्ष दीपक ननावरे, सचिव अंकुश कुंभार व खजिनदार सचिन भोसले व संभाजी दाभाडे (सर्व रा. बावधन) यांचा समावेश आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने बावधन यात्रा समितीवर गुन्हा दाखल