कोरोना राष्टीय आपत्ती घोषित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- कोरोनाला केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित केले आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी युद्धपातळीवर केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याची घोषणा करण्यात आली आहे. कोरोना विषाणूची लागण होऊन रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याला ४ लाख रुपयांची मदत देण्याचे पाऊल केंद्र सरकारने उचलले आहे. यासह कोरोनाविरोधी मोहिमेत सहभागी असलेल्यांनाही ही मदत दिली जाणार असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे. कोरोना राष्ट्रीय आपत्ती घोषित झाल्यामुळे देशातील सर्व राज्य सरकारे राष्ट्रीय आपत्ती कोषातून मदत मिळवू शकतात असेही सरकारने जाहीर केले आहे. __ भारतात आतापर्यंत कोरोनाचे १०० रुग्ण सापडले असून त्यातील १४ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत २ लोकांचा या विषाणूच्या बाधेमुळे मृत्यू झाला आहे. केंद्र सरकार याचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक ती सर्व कारवाई करीत असून देशातील नागरिकांनी काळजी घ्यावी. सतर्कता बाळगावी. घाबरून जावू नये असे सांगितले आहे.