सातारा (प्रतिनिधी)- सातारा जिल्हा रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे लॉक- डाऊनची कडक अंमलबजावणी सुरू असल्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेला जीवनावश्यक वस्तू मिळणे कठीण झाले आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने शहरी आणि ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यात जीवनावश्यक वस्त घरपोहोच देण्याची व्यवस्था करावी तसेच ज्याठिकाणी घरपोच देण्याची सुविधा देणे शक्य नसेल तेथे लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून सामाजिक अंतर ठेवत सकाळी किमान ३ तास तरी जीवनावश्यक वस्तंची दकाने सरू ठेवण्याची सूचना महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे.
जीवनावश्यक दुकाने तीन तास सुरू ठेवण्याची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची सूचना