जिल्ह्यात येण्यासाठी ३७हजार लोकांचे अर्ज

सातारा (प्रतिनिधी)- लॉकडाऊन ३ मध्ये मुंबई, पुणे आणि इतर जिल्ह्यात अडकलेल्या सातारा जिल्ह्यातील लोकांना आपापल्या जिल्ह्यांमध्ये जाण्याची मुभा राज्य सरकारने दिली असून प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्या परवानगीनेच जिल्ह्यात लोकांना प्रवेश करता येणार आहे. या प्रवेशासाठी सुमारे ३७ हजार लोकांनी ऑनलाईन नाव नोंदवले आहे.याबाबत एक प्रक्रिया राबविण्यात येणार असून त्यातील नियमांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पण ज्या लोकांना जिल्ह्यात यायचे असेल ते रेड झोनमध्ये असता कामा नयेत पण नाव नोंदणी केल्या सातारकरांपैकी बहुतेक रेड झोनमधील असल्याचे समजते.