सांगली जिल्ह्यात विनापरवाना प्रवेश प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकांसह चौघांविरुद्ध कारवाई

सांगली (प्रतिनिधी)- संपूर्ण सांगली जिल्ह्यात संचारबंदी आणि लॉकडाऊन असतानाही तसेच जिल्ह्यात प्रवेश बंदी असताना एका खासगी वहानातून सांगली जिल्ह्यात प्रवेश केल्याप्रकरणी मुंबईतील डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक, वरळी वाहतूक विभागातील पोलीस नाईक संतोष जाधव, हर्षदा जाधव व संतोष जाधव यांची मेहुणी मोहिनी जाधव या चौघांवर कासेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. __ कासेगाव चेकपोस्टवर सांगलीच्या दिशेने चाललेली एक कार न थांबता पुढे निघाली तेव्हा कासेगाव पोलीसांनी पाठलाग करून ती गाडी पकडली. त्यानंतर चौकशी करता त्यांनी कोणताही परवाना घेतला नसल्याचे आढळले. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.